पुण्यातल्या एनसीसी कॅडेट्सचा नवा विक्रम

January 15, 2009 9:11 AM0 commentsViews: 7

15 जानेवारीपुण्यातल्या 3 एनसीसी कॅडेट्सनी लहान वयात विमान चालवून एक नवा विक्रम रचलाय. हे तिन्ही कॅडेट्स 20 वर्षाचे आहेत. महिन्याभराच्या ट्रेनिंगनंतर त्यांनी विमान उडवण्याचा विक्रम रचला. प्रीतेश कदम प्राची देव, आणि स्नेहा छोडा अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत.या तिघांनी 18 महिन्यांपूर्वी एनसीसीत प्रवेश घेतला. तिथे त्यांना बेसिक ट्रेनिंग देण्यात आलं. त्यानंतर 10 कॅडेट्सची निवड बंगळुरूला झालेल्या ऑल इंडिया वायुसैनिक कॅम्पसाठी झाली. तेव्हापासून या पुण्याच्या कॅडेट्सनी वर्चस्व राखलंय. या दहा कॅडेट्सपैकी 4 कॅडेट्सची निवड झेनिथ सीएच 701 या विमानाच्या ट्रेनिंगसाठी झाली. आणि अखेर या तिघांचं सिलेक्शन झालं. त्यांनी विमानाचं यशस्वी उड्डाण केलं. या विक्रमानंतर या विद्यार्थ्यांचा आनंद शब्दात मावत नव्हता. "मी एवढच सांगू शकते की मी फार खुश आहे. विमान उडवणं हे माझं लहानपणापासूनच विमान उडवणं हे माझं स्वप्न होतं. एनसीसीच्या माध्यमातून ते अर्ध तर पूर्ण झालंय. आता जेव्हा मी भारतीय हवाई दलात प्रवेश करेन, तेव्हा माझं स्वप्न पूर्ण होईल" असं स्नेहा छाजेडनं सांगितलं.या नव्या विक्रमासोबत त्यांनी आणखी एक विक्रम रचलाय, तो म्हणजे सतत 3 तास 15 मिनिटं विमान उडवण्याचाही. जर या तिघांना बीएससीला साठ किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मार्क्स मिळाले, तर एसएसबीच्या परीक्षेनंतर भारतीय हवाई दलात प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग सोपा होईल.

close