सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार

June 24, 2013 6:11 PM1 commentViews: 360

salman khanमुंबई 24 जून : हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला कोर्टाने चांगला दणका दिला. मुंबईतल्या सेशन्स कोर्टाने सलमानची फेरविचार याचिका फेटाळलीय. सलमानवर आयपीसी 304 ( 2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार आहे.

2002 या वर्षी सलमाननं भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच्यावरती रॅश ड्रायव्हींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यावेळी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला नव्हता. काही महिन्यांपूर्वी वांद्र्याच्या संबंधित कोर्टाने सलमान खानचा खटला सेशन्स कोर्टात वर्ग केला होता. त्याला सलमान खाननं आव्हान दिलं होतं. सलमानचा अर्ज कोर्टानं आज फेटाळला.

  • YASH DAN

    SALMAN MUST BE SENTENCED ASAP. HE IS NOT A HERO JUST A CARELESS PERSON

close