उत्तराखंडमध्ये अजून 2,949 मराठी यात्रेकरू अडकले

June 24, 2013 8:27 PM0 commentsViews: 342

India Floodsमुंबई 24 जून : उत्तराखंडमध्ये राज्यातले अजून 2 हजार 949 यात्रेकरू अडकले आहेत. त्यातले 2 हजार 271 जण सुरक्षित आहेत. उरलेल्या यात्रेकरूंशी अजून संपर्क झाला नाहीय अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. बद्रीनाथमध्ये महाराष्ट्रातले 300 ते 400 लोक आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व यात्रेकरूंना सुखरूप बाहेर काढण्याचं आश्वासन उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. मदतकार्यासाठी राज्याचे 49 अधिकारी उत्तराखंडात तैनात आहेत.

close