नांदेड महसूल आयुक्तालयाविरोधात राज्यपालांकडे निवेदन

January 15, 2009 11:00 AM0 commentsViews: 6

15 जानेवारी, लातूरनांदेडमध्ये महसूल आयुक्तालंय स्थापन करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी लातूर विभागीय आयुक्तालंय निर्माण कृती समितीन, राज्यपाल एस.सी.जमीर यांच्याकडे केली आहे. तसंच या प्रकरणी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली, आढावा समिती स्थापन करून नव्यानं निर्णय घेण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली. समितीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल एस. सी. जमीर यांची भेट घेवून, यासंदर्भातलं निवेदन सादर केलं. दरम्यान, याप्रकरणी लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिली.नांदेडमध्ये महसूल आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेवून, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर कुरघोडी केल्याचं दिसून आलं. तसंच नांदेड लातूरच्या राजकिय संघर्षाला नव्यानं ऊत आलाय. दरम्यान या प्रकरणी 15 दिवसांमध्ये शपथपत्र दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत.

close