यात्रेकरूंच्या नातेवाईकांना अजितदादांनी ठेवलं ताटकळत

June 24, 2013 9:35 PM3 commentsViews: 1543

ajit pawarपुणे 24 जून : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या लोकांनी सुखरूप परतावं यासाठी सध्या त्यांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे. यासाठीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये आले होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु असल्यानं हे सगळेजण बराचवेळ तिथं थांबले.

अजित पवारांनी वेळ दिलीय, त्यामुळे आपल्याला त्यांना भेट घेऊ द्यावी, अशी या लोकांनी मागणी केली. पण, जिल्हा नियोजन समितीची बैठक संपवून अजित पवार नातेवाईकांना न भेटताच निघून गेले. त्यामुळे हे सगळेजण संतापले. शेवटी अजित पवारांनी साखर संकुलात या नातेवाईकांना बोलावून घेऊन त्यांची भेट घेतली. मात्र अजित पवारांच्या ‘बिझी शेड्युल’मुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

 • Deepak

  aata hyala kay bolayach..layaki nahi hyachi dada mhanaun ghyayachi…chor, pani chor, :) muta hyachya dokyavarr..hyachyach bhashett sangayach tar….

 • rahul bhoite

  dada is very sensetive leader. we have personaly lot of experiance about his work. i think he was forgot to meet pepole or not remamber to him they people are waiting.
  but other mns seivsena and bjp leaders not meet anybody without appointment.

 • nandkishor

  यात्रेकरूनो,हि वेळ लक्षात ठेवा विसरू नका..२०१४ ला अजित राव येतील तुम्हाला भेटायला तेव्हा तुम्हीही भेटू नका….

close