फरशीवाल्या बाबांना अटक

January 15, 2009 8:34 AM0 commentsViews: 153

15 जानेवारी त्र्यंबकेश्वर नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर इथल्या रघुनाथमहाराज जाधव उर्फ फरशीवाला बाबा यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्याच्या मूळ रहिवासी असलेल्या एका 38 वर्षीय साध्वीनं त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये फरशीबाबांनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्र्यंबकेश्वर जवळ या बाबांचा आश्रम आहे जिथे बाबा रुग्णांच्या डोक्यावर फरशीचा तुकडा ठेवून रोगाचं निदान करीत आणि उपचारही करत असत. या आश्रमात देशभरातून हजारोजण उपचारासाठी येत असतात. यासंबंधी नाशिकचे पोलीस अधिक्षक निखिल गुप्ता स्वत: तपास करत आहेत. या प्रकरणाबाबत पोलीस अधिक्षक गुप्ता सांगतात, गेली 3 वर्षे ही महिला या आश्रमात उपचारासाठी येत होती. त्यावेळी 2005ला फरशीवाल्या बाबाने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार तिने दाखल केली आहे. त्याची पुढील चौकशी आता चालू आहे.

close