चॅम्पियन धोणी ब्रिगेड !

June 24, 2013 11:02 PM0 commentsViews: 485

24 जून : टीम इंडियानं दिमाखात चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ. याआधी श्रीलंकेसोबत संयुक्तविजेतेपदावर भारताला समाधान मानावे लागले होते. पण या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतानं या स्पर्धेत अगदी सरावसामन्यापासून एकही सामना गमावला नाही.

“चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी देव तुम्हाच्या मदतीला धावून येणार नाही, आम्हालाच प्रयत्नांची शर्थ करून ती जिंकावी लागेल हे मी टीमला सांंगीतलं, आम्ही वन डेत नंबर वन टीम आहोत आणि म्हणूनचं आपल्या लौकीकास साजेसा खेळ करा, इतर कुणाच्याही मदतीवर विसंबून राहता येणार नाही”

धोणीनं आपल्या टीम सहकार्‍यांना दिलेल्या या साधा सरळ सोपा संदेश होता. ज्यानं अवघी इंग्लंडची टीम उध्दवस्त झाली. जेव्हा निर्णायक क्षण आला तेव्हा धोणीच्या याच यंग ब्रिगेडनं सारा दबाव झुगारत खेळ उंचावला आणि विजेतेपदही काबीज केलं. धोणीसाठी ही आणखीन एक गौरवास्पद कामगिरी… त्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा…

कॅप्टन म्हणून काहीतरी मिळवण्यासाठी मी कधीच मैदानावर उतरत नाही. माझ्यासाठी टीमचा विजय हा सगळ्यात महत्वाचा असतो. आणि त्याला सर्वोच्च प्राधान्यही असतं.

वन डे मध्ये इतक्या हुकुमतीनं भारताचा खेळ सहसा पाहण्यात येत नाही. पण गेल्या दोन आठवडयात इंग्लंडमधिल भारताचा खेळ कौतुकास्पद असाच आहे. बॅटिंगमध्ये दादागिरी, बॉलिंगमध्ये अचुकता, आणि फिल्डिंगमध्ये चपळता. भारतानं खेळातील सर्वच क्षेत्रात दिमाखदार कामगिरी केली. खर्‍या अर्थानं टीम इंडिया यंदा चॅम्पियन टीम होती. आणि यातील सर्वाधिक चॅम्पियन खेळाडू ठरले ते सर्वाधिक धावा करणारा शिखर धवन आणि सर्वाधिक विकेट घेणारा रवींद्र जडेजा..

पुढील वर्ल्डकपला आता फक्त दोन वर्ष उरलीत. आणि ज्या पध्दतीनं टीम इंडियानं यंग ब्रिगेडची बांधणी केलीय ती पाहता विश्वविजेतेपद राखण्याची पुर्ण क्षमता या टीममध्ये आहे. जगातील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारताच्या टीमचा प्रवास विजेतेपद राखण्याच्याच दिशेनं सुरु आहे. थोडक्यात येणार्‍या वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांना विजय साजरा करण्याच्या अनेक संंधी मिळणार एवढं नक्की…

close