मंदीमुळे करवसुली मंदावली

January 15, 2009 1:17 PM0 commentsViews: 2

15 जानेवारीआर्थिक मंदीमुळे या वर्षीच्या सरकारी करवसुलीत 35 ते 50 हजार कोटींची तूट आली आहे. अनेक उद्योग मंदीचा तडाख्यात सापडल्यानं सरकारी तिजोरीला हा फटका बसला आहे. हा तुटवडा भरुन काढायचा असेल तर येत्या तीन महिन्यात सरकारकडे 1 लाख 35 पस्तीस हजार कोटी कर जमा होणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या कॉर्पोरेट शहरातून यावेळी फक्त 5.9 टक्के कर जमा झालाय. सर्वात कमी कर बंगळुरू आणि चेन्नई या दक्षिणेतल्या शहरांमधून मिळालाय. करवसुलीत आलेल्या तुटवड्याचा परिणाम शेतकरी कर्जमाफीसारख्या योजनांवर होऊ शकतो.

close