‘मोदींनी फक्त गुजरात एके गुजरात करू नये’

June 25, 2013 3:07 PM1 commentViews: 480

sena on modi25 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रलयानंतर आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. अलिकडेच नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमध्ये जाऊन मदतकार्याची पाहणी केली होती. त्यावरून भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही त्यांना चार शब्द सुनावले. देशाचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गाजावाजा होत असताना नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात एके गुजरात करू नये असा सल्ला शिवसेनेनं आपल्या मुखपत्र ‘सामना’मधून त्यांना देण्यात आलाय. सामनामधून भाजपवर सातत्यानं टीका करण्यात येत असल्यानं हा भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही बोलंल जातंय.

‘सामना’तून मोदींवर टीका

“देश मोठा आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची नियुक्ती आता राष्ट्रीय कार्यासाठी झाली आहे. मोदी यांनी उत्तराखंडात
जाऊन गुजराती भाविकांना वाचविले असे सांगणे बरोबर नाही. या कामाबद्दल गुजरात सरकार व मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच. पण देशाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड होत असताना मोदी यांनी फक्त गुजरात एके गुजरात करावे व आपण फक्त गुजरात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाचा विचार करतो अशी भूमिका घ्यावी हे मारक आहे. आपत्तीच्या प्रसंगी संकुचित किंवा प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय विचार करणे आवश्यक आहे.

आमच्यावर प्रांतीयतेचे शिक्के मारले जातात, पण उत्तराखंडातील महाप्रलयात मदत करण्यासाठी तेथे शिवसेना नेटाने उतरली आहे व गरजूंना जमेल तशी मदत करीत आहे. मोदी यांना ‘फेकू’ म्हटल्याने काँग्रेसची नालायकी लपत नाही.अर्थात मोदी यांचा धसका काँग्रेसने घेतल्याचा हा संताप आहे. तरीही मोदी प्रचारकांनी यापुढे थोडा संयम पाळला तर बरे!”

  • Nitin Joglekar

    Do not be at sea if you see a vertical split in Sena

close