एसईझेडसाठी पिकात जेसीबी फिरवलं

January 15, 2009 10:05 AM0 commentsViews: 1

15 जानेवारी औरंगाबादऔरंगाबादजवळच्या अजंता फार्मा एसईझेडसाठी सरकारनं 128 एकर जागा संपादित केली. ही 128एकर जागा घेताना जिल्हा प्रशासनानं शेंद्रामधल्या उभ्या पिकांत जेसीबी मशीन फिरवलं. इथले शेतकरी या कारवाईविरुद्ध दाद मागण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या ऑफिसमध्ये गेले. पण त्यांच्याकडे कुणीही फिरकलं नाही. त्यावेळी हताश झालेल्या शेतक-यांनी अक्षरश: टाहो फोडला. तेव्हा पालकमंत्री पतंगराव कदम त्यांना भेटायला आले. पालकमंत्री असलेल्या पतंगराव कदम यांना या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. पण शेतक-यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता त्यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले.

close