‘संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजूट’

June 25, 2013 1:50 PM2 commentsViews: 145

pm on terror attack25जून :दहशतवाद्यांना कधीच त्यांच्या कामात यश मिळणार नाही, त्यांच्याविरोधातील लढाईत आज संपूर्ण भारत देश एकजूट आहे असं प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलंय. आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी काश्मीर दौर्‍यावर आहेत. इथं झालेल्या एका सभेत ते बोलत होते.

सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला यानंतर आपला दौरा रद्द न करत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. रातले वीज प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान आणि सोनिया गांधी किश्तवारला भेट दिली. यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी दहशतवाद्यांविरोधी कारवाईत प्राणाची बाजी लावणार्‍या शहीद जवानांना श्रद्धाजंली वाहिली. आज संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या विरोधात एकजूट उभा राहिला आहे. त्यांना त्यांच्या कामात कधीच यश येणार नाही. विकासासाठी सुरक्षा असणे आवश्यक आहे. या भागात दहशतवाद्यांचे हल्ले हे शांती,सलोखा निर्माण करण्यास अडथळा आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी म्हटलंय. तसंच 2012 सालात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद गेल्या दोन दशकांच्या तुलनेत घट झालीय असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. तर आयएएस आणि आयपीएस सारख्या लोकसेवांमध्ये काश्मिरी तरूणांची संख्या वाढल्याचा आनंद आहे असं सोनिया गांधी म्हणाल्या.
पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ बंद

दरम्यान, पंतप्रधानांच्या काश्मीर भेटीच्या निषेधार्थ हुर्रियत कॉन्फरन्सनं काश्मीर खोर्‍यात बंदचं आवाहन केलंय. तसंच सोमवाकी हिजबूल मुजाहिद्दीननं लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यात 8 जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि किश्तवार या शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागला.

  • nandkishor

    Manmohan singh ajun amchya kiti javanana shahid hoyala sangnar ahe….kiti sahan karayach amhi…amchya javanani…bhavishyat mahasatta bananarya bharat deshache tumhi PM ahat ha ek kalank ahe bharta sathi…..

  • swapnil joshi

    are yadpata ata dahshavad pahtoy ….bomb futle teva ka mashya marat hota …ata uttarakhand madhe poor ala ahe tithe kahi tari kar…

close