राहुल गांधींनी घेतली प्रलयग्रस्तांची भेट

June 25, 2013 1:15 PM1 commentViews: 126

RAHUL IN GUPTKASHI_125 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रलयानंतर राजकारणाला सुरूवात झाली. मोदींच्या भेटीमुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडत असताना  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज गुप्तकाशीच्या दौर्‍यावर आहेत. तिथं त्यांनी मदत छावणीला भेट दिली, तसंच चार धाम विमानतळावर त्यांनी पायलट आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी यावेळी सीएनएन आयबीएननं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. उत्तराखंडमधल्या प्रलयानंतर तब्बल आठ दिवसांनी राहुल यांनी तिथं भेट दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सोमवारी ते डेहराडूनला गेले आणि हवाई पाहणी केली. दरम्यान, प्रलयग्रस्त उत्तराखंडला व्हिआयपींनी भेटी देऊ नयेत या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेकडे या दौर्‍यादरम्यान दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय.

  • Aparna Kuchekar

    What was need to him to go there and to desturb the rescue routine going on? How does it helped to peoples of that place? If he really wants to help, he should give some money from his own pocket for the food and facilities to be supplied to those peoples by our real heroes…………

close