उत्तराखंड अपडेट

June 25, 2013 6:12 PM0 commentsViews: 474

25 जून : उत्तराखंडमध्ये सगळीकडे पाऊस पडत असूनही बचावकार्य सुरू आहे. अजून 9000 लोकांना वाचवण्याचं आव्हान लष्कर आणि आयटीबीपीसमोर आहे. हवामान सध्या स्वच्छ झाल्यामुळे सर्व तळांवरून हवाई मार्गानं बचावकार्य सुरू ठेवण्यात आलंय.

 

मात्र, उत्तरकाशी आणि चामोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा हवाई मार्गाने मदतकार्यात अडथळे येतील अशी भीती आहे. बद्रीनाथ आणि हर्शीलमध्ये मात्र जोमात मदतकार्य सुरू आहे.

 

सध्या बद्रीनाथमध्ये सर्वाधिक लोक अडकलेले आहेत. केदारनाथच्या मार्गावर असलेल्या गुप्तकाशीमध्ये मदतकार्य संपत आलंय. पुढचे 72 तास हवामान स्वच्छ राहिल्यास, मदतकार्य पूर्ण होईल असं उत्तराखंड सरकारनं कृती अहवालात म्हटलंय. बद्रीनाथ, जोशीमठ, गौचर, उत्तरकाशी आणि इतर ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झालाय.

close