टेलिकॉम कंपनी ‘नॉरटेल’ कर्जबाजारी

January 15, 2009 2:13 PM0 commentsViews: 7

15 जानेवारीजागतिक मंदीपुढं अनेक कंपन्या शरणागती पत्करतायत . उत्तर अमेरिकेतल्या टेलिफोन उपकरणं बनवणार्‍या नॉरटेल कंपनीनंही दिवाळखोरी जाहीर केलीये. एकेकाळी जोमाने चालणार्‍या या कंपनीला आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसलाय. कॅनडातील टॉरेंटोमधल्या या कंपनीवर बारा अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. नॉरटेलची भारतातल्या सास्केन कम्युनिकेशन्स, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये एकूण साडेनऊ टक्के गुंतवणूक आहे. तसंच रिलायन्स कम्युनिकेशन्स ,बीएसएनएल, भारती-एअरटेल, बीपीएल मोबाईल या टेलिकॉम कंपन्याही नॉरटेलच्या ग्राहक आहेत. त्यामुळे नॉरटेलच्या या बड्या आयटी आणि टेलिकॉम ग्राहक कंपन्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. पण आशिया खंडातील कंपन्यांशी केलेल्या सौद्यांवर दिवाळखोरीचा फारसा फरक पडणार नाही असं नॉरटेल कंपनीचं म्हणणं आहे.

close