सिंधुदुर्गातील वीज प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

January 15, 2009 8:33 AM0 commentsViews: 1

15 जानेवारी, सिंधुदुर्गसिंधुदुर्गात येणार्‍या मायनिंग आणि औष्णिक वीज प्रकल्पाच्या विरोधात कोकण रक्षण आणि समृध्दी मंचाने आघाडी उघडली आहे. गावोगावच्या शेतक-यांचा याला उत्स्फ़ूर्त पाठिंबा मिळतोय. सावंतवाडी तालुक्यात धाकोरे इथं दोन हजार मेगावॅटच्या औष्णिक वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. त्या विरोधात आजूबाजूच्या गावातील लोक एकवटले आहेतत. नैसर्गिक संपत्तीनं संपन्न असलेल्या सिंधुदुर्गात असे प्रकल्प लोकांनी स्वीकारू नयेत म्हणून कोकण रक्षण मंच जनजागृतीचं काम करत आहे.

close