महागई दरात पुन्हा घट

January 15, 2009 2:40 PM0 commentsViews: 4

15 जानेवारीतीन जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दर 5.91 टक्क्यावरुन 5.24 टक्क्यांवर उतरला. महागाई दर गेल्या आठ्ठेचाळीस आठवड्यांच्या सगळ्यात खालच्या स्तरावर पोहचला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत घसरण झाल्यानं महागाई दरात घट दिसलीय. उत्पादित वस्तूंच्या किमतीतही एका टक्क्यांची घट झालीय तर भाज्याची किमतीही तीन टक्क्यांनी खाली आल्यात. येत्या मार्च महिन्यात महागाई दरात तीन ते चार टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे

close