पंचगंगेच्या प्रदूषणास जबाबदार घटकांना नोटीस

January 15, 2009 10:25 AM0 commentsViews: 76

15 जानेवारी कोल्हापूरकोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पंचगंगा नदी बचाव संघटनेनं प्रदूषण नियंत्रण महामंडळाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे महामंडळानं प्रदूषणाला जबाबदार असणा-या घटकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.उगमापासूनच पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळाख्यात आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगेचं रूपांतर गटार गंगेत झालं. त्यामुळे सुमारे 4 लाख लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्याचबरोबर पाण्यातली जैवविविधताही संकटात सापडली आहे. पंचगंगा संवर्धन समितीनं आंदोलन करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करायला भाग पाडलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं एकूण 35 घटकांना पंचगंगेच्या प्रदूषणासाठी जबाबदार धरलं आहे. त्यात कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका आणि 5 साखर कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याला कारखाना बंद का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच इचलकरंजीतल्या 26 कापड प्रोसेसनाही कारणे दाखवा नोटीस बजावून काहींची वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलं आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार धरून प्रदूषण नियत्रंण महामंडळानं संबधीत घटकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु फक्त नोटीस बजावून उपयोग होणार नाही. तर संबधीत घटकावर कारवाई करण्याची गरज आहे.

close