नगरसेविकांमध्ये हाणामारी

June 25, 2013 8:49 PM0 commentsViews: 1520

25 जून : मुंबई महापालिकेच्या सभागृहात एक अत्यंत अशोभनीय प्रकार घडलाय. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेविकांमध्ये चक्क हाणामारी झाली. काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांनी सभागृहातच मारहाण केली आहे.

 

महापालिकेत बोलू दिलं जात नाही असा आरोप करत शीतल म्हात्रे यांनी महापौरांच्या दिशेनं बांगड्या भिरकावल्या. रेसकोर्सच्या विषयावर ठरावाची सूचना मांडण्यात आली त्यावेळी म्हात्रे यांनी बोलण्याची संधी मिळावी अशी सभागृहात विनंती केली. मात्र, महापौरांनी त्यांना बोलू दिलं नाही. त्यावेळी शितल म्हात्रे यांनी महापौरांच्या दिशेने बांगड्या भिरकावल्या. त्याचा संताप म्हणून शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांनी शीतल म्हात्रेंच्या कानशिलात लगावली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि सेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आमनेसामने आले. महापालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच असा लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला.

close