बिबट्यानं कुत्र्याला पळवलं

June 25, 2013 9:07 PM2 commentsViews: 1593

मुंबई 25 जून : मुलुंडमधल्या एका रहिवासी कॉलनीत रविवारी रात्री बिबट्यानं एका कुत्र्याला पळवून नेलं. इथल्या घाटीपाड्यातल्या लोकनिसर्ग सोसायटीतल्या बी 7 या विंगमध्ये बिबट्या घुसला आणि त्यानं एका कुत्र्याला खेचत नेलं. या कॉम्प्लेक्समध्ये यापूर्वीही गेल्या वर्षभरात बिबट्या 5 कुत्र्यांना घेऊन गेलाय. रविवारी रात्री अडीचच्या सुमाराला बिबट्या आला आणि त्यानं कुत्र्याला खेचत नेलं. हे दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या घटनेदरम्यान बिल्डिंगचा वॉचमन लोखंडी दरवाजामागे लपून बसल्यानं त्याचा जीव वाचला. वनविभागाची संरक्षक भिंत तुटल्यामुळे बिबट्या कॉम्प्लेक्समध्ये आल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.

  • sa

    sasas

  • sa

    sasdfdfdf

close