शकील सिद्दीकी निराश

January 15, 2009 4:01 PM0 commentsViews: 2

15 जानेवारी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या सीडीज आणि पुस्तकं जाळली होती. आता मात्र मनसेनं थेट आंदोलनाला सुरूवात केली. मनसेचे 25 ते 30 कार्यकर्ते अंधेरीतल्या मोहन स्टुडिओत घुसले. आणि गोंधळ घालत त्यांनी 'कॉमेडी सर्कस'चं शूटिंग बंद पाडलं. पाकिस्तानी कलाकार शकील सिद्दीकी याला सेटबाहेर काढलं. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मुंबई-महाराष्ट्रात कार्यक्रम करू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. मनसेच्या आंदोलनानंतर पाकिस्तनात परतलेल्या शकील सिद्दीकीला या घटनेची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, मला भारत सोडण्यासाठी धमकावण्यात आलं. त्यामुळेच मी पाकिस्तानात परतलो. झालेला प्रकार नक्कीच चांगला नव्हता. असं असलं तरी भारतीय नागरिक पाकिस्तानी कलाकारांवर प्रेम करतात हे मात्र खरं.

close