आश्रम शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग

June 25, 2013 9:21 PM0 commentsViews: 363

vasi343वसई 25 जून : राज्यातील आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई वसईतील कामण प्राथमिक आश्रम शाळेत सातवीत शिकणार्‍या एका मुलीचा मुख्यध्यापकांनीच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला.

संजय नेरे असं या मुख्याध्यापकाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुख्यध्यापकाने या पीडित मुलीला 22 जून रोजी रात्री 8 वाजता आपल्या कार्यालयात बोलावले आणि तिच्याशी अश्लील चाळे करत होता. त्यावेळी दुसरे शिक्षक तेथे आल्यानं आपली सुटका झाल्याचं या मुलीनं पोलिसांना सांगितलंय.

close