पुणे पालिकेची सर्वसाधारण सभेत मनसेचा गोंधळ

June 25, 2013 9:27 PM0 commentsViews: 280

pune palika25 जून : पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोधळानं गाजली. महापौर वैशाली बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील काही पदाधिकार्‍यांनी अभ्यास दौर्‍याच्या नावावर आपल्या कुंटुंबीयांना विदेश वारी करवल्याचा आरोप मनसेनं केला.

खासगी संस्थाना डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आपल्याचा कुंटुंबीयांनच खासगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून सहभागी करून घेतलं. पालिकेच्या पदाधिकार्‍यांकडून पुणेकरांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही मनसेनं केला. दरम्यान, मनसेच्या आंदोलनानतंर महापौरांनी पुणेकरंाची माफी मागितली.

close