दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत पावसाची हजेरी

June 25, 2013 9:41 PM0 commentsViews: 149

usmanbad rain25 जून : दोन वर्षांपासून दुष्काळाचा तीव्र सामना करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात अखेर रिमझिम पावसाला सुरुवात झालीयं. जिल्ह्यातील आठ तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पडणार्‍या पावसानं काही प्रमाणात बळीराजा सुखावलाय. मात्र समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरणीची काम खोळंबली आहे.

वर्धा जिल्ह्यातही आठवडाभरानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीयं. गेल्या बारा तासांपासून पडणार्‍या जोरदार पावसामुळे नदीनाले ओसांडून वाहू लागले आहे. जोरदार पावसामुळे गेल्या दहा वर्षात धरणांच्या पातळीत पहिल्यांदाच वाढ झालीय. शेतकरी या पावसाने सुखावलेत.

कपाशी पेरणी 95 टक्के तर सोयाबीनची पेरणी 90 टक्के पूर्ण झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीत वाढही झालीयं. जिल्ह्यात सर्वाधिक 50 एमएम पावसाची नोंद देवळी येथे झाली आहे. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड पण झाल्याचे वृत्त आहे.

close