रग्बीनेही पाडली कोलकात्यावासियांना भुरळं

January 15, 2009 4:09 PM0 commentsViews: 1

15 जानेवारी कोलकाताकोलकाता शहर आणि फुटबॉल यांच्यातलं नातं तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याच कोलकातावासियांना सध्या आणखी एका खेळाने आकर्षित केलंय. शहरातली तरुण मुलं फुटबॉल बरोबरच रग्बी खेळही उत्साहाने खेळताना दिसत आहेत. झोपडपट्टीत राहणा-या काही मुलांसाठी तर हा खेळ जगण्याचा एक नवा मार्ग ठरला आहे.रग्बी हा जगातल्या सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इटली या देशात तो घरा-घरात खेळला जातो. आणि आता भारतातही हा खेळ आपली पाळमुळं पसरू लागला आहे.इंग्लंडमधल्या एका कंपनीने पुढाकार घेऊन रग्बीची टीम तयार केली आहे. आणि टीमच्या प्रशिक्षणासाठी इंग्लंडमधले काही व्यावसायिक रग्बीपटूही त्यांनी भारतात बोलावले आहेत. त्यांनी आता आपलं लक्ष कोलकात्यातील तरुण तसंच शाळकरी मुलांवर केंदि्रत केलं आहे.

close