1983च्या वर्ल्ड कप विजयाला 30 वर्ष पूर्ण

June 25, 2013 10:35 PM0 commentsViews: 217

25 जून : इंग्लंडमध्ये महेंद्रसिंग धोणीच्या टीमनं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स खिताब पटकावलाय. आणि योगायोग म्हणजे याच इंग्लंडमध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकला होता. या घटनेला आज 30 वर्ष पूर्ण होत आहेत.

भारतीय क्रिकेटचा सुवर्णक्षण,1983 वर्ल्ड कप विजय, भारताचा ऐतिहासिक विजय, 25 जून रोजीला 30 वर्ष पूर्ण…

मोहिंदर अमरमाथनं वेस्टइंडीजचा शेवटचा बॅटस्‌मन मायकेल होल्डिंगला एल.बी. डब्ल्यु केलं आणि हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिला गेला. हा दिवस होता 25 जून 1983.

कपिल देवच्या नेतृत्वाखाली लॉर्डवर बलाढ्य वेस्टइंडीजचा पराभव करत भारताने वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. विजयासाठी भारतानं ठेवलेलं 183 रन्सच आव्हान वेस्टइंडीजला पेलवलं नाही. आणि त्यांची पूर्ण टीम 140 रन्समध्ये ऑलआऊट झाली.

कॅप्टन कपिल देवनं वर्ल्डकप उंचावला तो क्षण आजही भारतीय क्रिकेट फॅन्सच्या मनात ताजा आहे. सुनील गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा आणि बलविंदर सिंग संधू हे त्या ऐतिहासिक विजयाचे हिरो ठरले.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीला येत्या 25 जूनला 30 वर्ष पूर्ण होतायत..पण क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही या विजयाच्या आठवणी ताज्या आहेत.

close