शौर्यासाठी पुरावे

January 15, 2009 6:00 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी 26/11च्या हल्ल्याच्यावेळी प्राणाची बाजी लावून लढणा-या पोलीस अधिका-यांच्या नावांची शिफारस राष्ट्रपतींच्या शौर्यपदकासाठी राज्य सरकारनं केली आहे. पण यातल्या काही नावांना केंद्र सरकारनं आडकाठी घेतल्याचं वृत्त आहे. सरकारनं फक्त शिफारस करण्याचं काम केलंय. त्यावरचा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे, असा खुलासा राज्यांचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, अवॉर्ड किती जणांना देणार, कोणाला देणार, कोणाच्या शौर्याला देणार यांचा निर्णय केंद्र सरकार करणार आहे. केंद्राला आवश्यक ती माहिती आम्ही दिली आहे. आता पुढचा निर्णय केंद्र सरकार करणार आहे.

close