नक्षलवाद्यांच्या अड्‌ड्यातून !

June 25, 2013 11:26 PM1 commentViews: 379

naxal 2महेश तिवारी, गडचिरोली
25 जून : गेल्या महिन्यात छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर बस्तरचा प्रदेश पुन्हा चर्चेत आलाय. याच भागात असलेलं अबुझमाडचं जंगल हे नक्षलवाद्यांचं केंद्र आहे, असा पोलिसांचा कयास आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेलं अबुझमाड भौगोलिक दृष्ट्या अजूनही अपरिचित आहे. या भागात नक्षवाद्यांची सत्ता चालते. नक्षलवाद्यांच्या या गढात आयबीएन लोकमत पोचलंय. तिथल्या परिस्थितीचा हा आढावा..

अबुझमाड….घनदाट जंगल, लोहखनिज आणि हिर्‍यांच्या खाणी पोटात घेतलेलं उंच उंच पहाड…इंद्रावती आणि गोदावरी नद्यांनी विभागलेली महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशची सीमारेषा, सुमारे दहा ते पंधरा हजार चौरस किलोमीटरचा हा परिसर….अबुझ म्हणजे माहित नसलेला आणि माड म्हणजे उंच रहस्यमय प्रदेश असा…या भागातल्या 240 गावात नक्षलींचं समांतर सरकार चालतंय. हाच भाग नक्षलींचं मुख्य केंद्र आहे.

अबुझमाडमध्ये असलेल्या शाळांमधून नक्षलवाद्यांना हवं असलेलं प्रशिक्षण दिलं जातं. गुरील्ला पद्धतीनं हल्ला करणं, भुसुरुंग स्फोट घडवणं, अंबुश याचं प्रशिक्षण इथं देण्यात येतं. नक्षलवाद्यांचे सर्वोच्च नेते मुप्पाला लक्ष्मणराव ऊर्फ गणपती, मिलटरी कमांडचा प्रमुख नंबाला केशव ऊर्फ गंगान्ना तसंच भूपतीसारखे बडे नेते याच भागात राहतात.

2004 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक शिरीष जैन आणि दोन वर्षांपूर्वी सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांनी घुसण्याचा अबुझमाडमध्ये प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलंय. त्यामुळंच हा प्रदेश आजही नक्षलवाद्यांची राजधानी बनलीय.

नक्षलवाद्यांच्या विरोधात व्युहरचना
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या रॅलीवर हल्ला केला. या हल्ल्याची केंद्रानं गंभीर दखल घेतलीय. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधात व्युहरचना करण्यात येतेय. छत्तीसगडचा बस्तर, महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया, आंध्रप्रदेशात तेलंगणा, ओरिसाचा सीमावर्ती भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जातो. मागील तीन महिन्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित समजल्या जाणार्‍या भागात जाऊन 27 नक्षलींना ठार केलं होतं. नक्षलवाद्यांना अबुझमाडच्या क्षेत्रातून हद्दपार करण्यासाठी पाच राज्यांनी केंद्राच्या नेतृत्त्वाखाली तयारी केली होती. पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षणाबरोबरच अत्याधुनिक साधनं देण्यात आली. मात्र जीरमघाटीत हल्ला घडवून नक्षलवाद्यांनी सरकारच्या तयारीला धक्का दिला.

 
सरकारची व्यूहरचना

 • नक्षलींविरोधात सरकारचं ऑपरेशन ग्रीनहंट
 • नक्षलवाद्यांची राजधानी अबुझमाडला घेरणे
 • CRPF, BSF आणि इंडोतिबेटियन सुरक्षा दल तैनात करणं
 • मोहिमेत 17 हेलिकॉप्टर्सचा वापर करणार
 • बिलासपूरमध्ये आर्मीब्रिगेड हेडक्वार्टर
 • एअर फोर्स बेस कॅम्प तयार करणे
 • स्थानिक पोलिसांना विशेष प्रशिक्षण
 • मोहिमेत स्थानिक पोलिसांना प्राधान्य

 

छत्तीसगड पोलीस मात्र या कारवाई बाबत गुप्तता पाळून आहेत. ऑपरेशन ग्रीनहंटला उत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांनी कमांड कंट्रोल व्यवस्था तयार केलीय. नक्षलवाद्यांना विशेष प्रशिक्षणाबरोबरच एके 47, लाईट मशीनगन, अंधारात पाहण्यासाठी लाईट व्हिजन, 6 डीव्हाईस पुरवलंय. ही सगळी आधुनिक सामग्री चीन, बेल्जियममधून मिळवलीय. चिदंबरम गृहमंत्री असताना ऑपरेशन ग्रीनहंटची अंमलबजावणीची तयारी झाली होती. मात्र मानवाधिकाराची पायमल्ली होईल, अशी ओरड झाल्यानं ही मोहीम थंडावली. परंतु छत्तीसगडमधील हल्ल्यानंतर सरकार ही मोहीम पूर्ण ताकदीनं राबवण्यास तयार झालंय.

 • Vishal K Jadhav

  naxalwad sampavta yenar nahi ka?

close