करझाईंच्या निवासस्थानावर दहशतवादी हल्ला

June 26, 2013 12:10 AM0 commentsViews: 97

hamid kazjai25 जून : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबाननं राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यांच्या अंगरक्षकावरही गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कितीजण जखमी किंवा ठार झालेत त्याची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र, सर्व हल्लेखोर मारले गेले आहेत. एका हल्लेखोरानं बनावट ओळखपत्राच्या आधारे अध्यक्षांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मारला गेला. अमेरिकेने तालिबानशी शांतता चर्चा करायला करझाई यांचा विरोध आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तालिबानने हा हल्ला केला.

close