बीएआरसीचे कर्मचारी संपावर

January 15, 2009 4:11 PM0 commentsViews:

15 जानेवारी मुंबईनॅशनल फेडरेशन ऑफ ऍटॉमिक एनर्जी एम्पलॉईज 19 जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. नाफी या बॅनरखाली बीएआरसीच्या ऍटोमिक विभागात काम करणा-या देशभरातील एकूण 22 युनियन यासाठी एकत्र आल्या आहेत.देशभरातून 22,000 कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. हे सर्व कर्मचारी हे नॉन गॅझेटेड वर्गातील आहेत.सहाव्या वेतन आयोगात ऍटॉमिक एनर्जी आणि स्पेस एनर्जी यांना मान्य केलेल्या सवलतींमध्ये खूप तफावत आहे. म्हणून समान वेतनश्रेणीची मागणी करण्यात आहे. नाफीच्या म्हणण्या प्रमाणे बीएआरसीमध्ये ऍटॉमिक एनर्जी आणि स्पेस एनर्जी असे दोन विभाग आहेत पण त्यातील स्पेस एनर्जी विभागाला वेळच्यावेळी प्रमोशन मिळतं. पण ऍटॉमिक एनर्जीला यातून डावलण्यात येतं. हे दोन्ही विभाग सारखेच महत्त्वाचे आहेत. मग वेगवेगळी वागणूक का? असा सवाल नाफीने केला आहे. आत्तापर्यंत एक दिवसाचा उपवास करुन,काळ्या फिती बांधून या गोष्टीचा निषेध केला तरीही त्यांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आता देशव्यापी संपाशिवाय त्यांच्यापुढे कोणताच उपाय नाही अस त्यांच म्हणणं आहे.

close