नाशिकमध्ये मनसेच्याच पदाधिकार्‍यांचं अतिक्रमण !

June 26, 2013 2:02 PM0 commentsViews: 1345

nasik_mnsदीप्ती राऊत, नाशिक

26 जून : मनसेचे लोक आड आले तरी अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आणि नाशिकमध्ये त्यांचेच पदाधिकारी अतिक्रमणं करत आहेत. इतकंच नाही तर महापालिकेत ठराव करून ती अतिक्रमणं नियमितही करत आहेत. मनसेच्या या नाशिकमधल्या नवनिर्माणावर हा विशेष रिपोर्ट

“मी आत्ताच आयुक्तांना आणि महापौरांना सांगून आलो, अतिक्रमणं तोडताना माझ्याही पक्षाचे लोक आडवे आले तरी सहन केलं जाणार नाही.”

नाशिक महापालिकेच्या अधिकार्‍यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली सूचना…पण जर या अतिक्रमणांचंच उदात्तीकरण होत असेल तर…आता नाशिक मधला प्रभाग क्रमांक 31 बघा… इथल्या सर्वेनंबर 39 मधल्या इमारतीसमोर मनसेप्रणित भीमराज नामक एक बांधकाम झालंय. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन हे वाचनालय असल्याचंही भासवलं जातंय.

पण लोकांच्या मागणीनुसार ओपन स्पेसमध्ये हे बांधकाम केल्याचं मनसेच्या नगरसेविकांचे म्हणणं आहे. मेघाताई मनसेच्या नगरसेविका आहेत आणि त्यांचे पती शहर संघटक… हे अतिक्रमण 15 दिवसात तोडावं अशी नोटीस नाशिक महापालिकेनं यांना 12 मार्चला दिली होती. पण,

आम्ही स्थायी समितीपुढे प्रस्ताव मांडलाय. मंजुरी घेतलीए. आता लवकरच प्रशासकीय मंजुरीही मिळेल असं मनसेचे शहर संघटक नितीन साळवे सांगतात.

म्हणजे नगररचनाविभाग अतिक्रमण हटवण्याची नोटीस देतं आणि नगरसेवक स्थायी समितीतून अतिक्रमण नियमित करण्याचे ठराव करतं. असं हे नाशिकमधलं नवनिर्माण…

close