पुण्यात मनसेनं घातला पेटाशी वाद

January 15, 2009 5:54 PM0 commentsViews: 2

15 जानेवारी पुणेनितीन चौधरीपेटा या प्राणीप्रेमी संघटनेनं पुण्यात आंदोलन केलं. हे आंदोलन होतं केएफसी या चिकन उत्पादन करणा-या कंपनीविरुद्ध. त्यासाठी पेटानं नऊवारीतल्या तीन मुलींना पिंज-यात डांबलं आणि त्यांचं कॅम्पेन सुरू केलं. पेटाच्या या निदर्शनांना मनसेनं मात्र कडवा विरोध केला आणि मुलींची सुटका केल्यानंतरच त्यांचा राडा थांबवलाकेएफसी ही चिकनचं उत्पादन करणारी मल्टीनॅशनल कंपनी कोंबड्यांना कशी अमानुष पद्धतीनं मारते, तेच दाखवण्याचा पेटाचा उद्देश होता. लोक येत जात होते तसंच पेटाचे कार्यकर्ते आपापलं काम करत होते. तसंच पिंज-यातील मुलीही स्वस्थ बसून होत्या. पण पिंज-यातल्या मुलींची नऊवारी साडी मनसेला खटकली.आणि त्यांची गाडी पेटावर धडकली. पेटानं त्यांच्या पद्धतीनं यावर सारसारव करण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढतच गेला.अखेर मुली पिंज-यातून बाहेर आल्या आणि पिंज-याबाहेरचा कलकलाट थांबला. पुणेकर यापुढे केएफसीची चिकन खातील की नाही हा पुढचा प्रश्न. पण नऊवारीच्या मुद्यावरून मिळालेल्या मनसेच्या दणक्याने पेटाची अवस्था मात्र कोंबडीसारखीच झाली.

close