उत्तराखंडमध्ये अजूनही 8000 लोक अडकलेले

June 26, 2013 1:04 PM0 commentsViews: 127

utrakhand 26 june 13उत्तराखंड 26 जून : जोशीमठाजवळ बचावकार्य वेगात सुरु आहे. बद्रीनाथमध्ये अडकलेल्या यात्रेकरुंना एमआय-17 विमानानं तिथे आणलं जातंय. आज पावसाळी ढग कमी असले तरी हवामान खात्यानं काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अजूनही 8000 लोकांना वाचवण्याचं आव्हान लष्कर आणि आयटीबीपीसमोर आहे. हर्सिल भागात बचावकार्य वेगात सुरू आहे. तर केदारनाथ भागात येणार्‍या गुप्तकाशीमधलं बचावकार्य जवळपास संपत आलंय.

बद्रीनाथ, जोशीमठ, गौचर, उत्तरकाशी आणि इतरही भागातला पाणीपुरवठा सुरळीत सुरू झालाय. पण, गाळाखाली अजूनही अनेक मृतदेह गाडले गेले असण्याची शक्यता NDRFच्या जवानांनी व्यक्त केलीय. त्यामुळे बचावकार्यात आजही अडथळे येण्याची शक्यता आहे.

close