कुलाब्यात अंडरग्राऊंड पार्किंगची सुविधा

January 15, 2009 1:23 PM0 commentsViews: 1

15 जानेवारी मुंबईमुंबईतल्या रस्त्यांवर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या सध्या मुंबईकरांना सतावतेय. यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका अंडरग्राउंड पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. कुलाब्याचा रिगल सिनेमा आणि क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी ही सुविधा तयार करण्यात येणार आहे.पुढील दोन महिन्यात हे काम सुरू होणार असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं आहे.1200 ते 1500 गाड्या पार्क करण्याची क्षमता असलेला अंडरग्राउंड पार्किंग प्लॉट रिगल सिनेमाजवळ तयार करण्यात येणार आहेत.

close