शाहू महाराजांचं जीवनकार्य जाणार सातासमुद्रापार

June 26, 2013 9:46 PM0 commentsViews: 345

कोल्हापूर 26 जून : रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य सातासमुद्रापार जाणार आहे. महाराजांच्या जीवनावर आधारीत डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहलेला राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य ” हा त्यांचा चरित्र ग्रंथ आता इंग्रजी, जर्मन, जपान, फ्रेंच, आणि रशियन अशा पाच भाषेत अनुवादीत होऊन सातासमुद्रापलिकडे पोहोचणार होणार आहे. जर्मन भाषेचे अनुवाद स्विझर्लंड मधील सुधीर पेडणेकर यांनी पूर्ण केलंय. रशियन भाषेतला अनुवाद डॉ. मेघा पानसरे यांनी केलाय. तर फ्रेंच जपानी भाषेतला अनुवादाचे काम सुरु आहे. देशातील 14 प्रादेशिक भाषेतही राजश्री शाहू स्मारक ग्रंथ हा पोहचवण्याचे प्रयत्न सुरु असून कन्नड, गुजराती नंतर लवकरच सिंधी, उर्दू आणि तेलगू भाषेत अनुवाद तयार झाला असून तो प्रकाशित होणार आहे.

close