अजित पवारांना सत्काराचा अर्धा नारळ

January 15, 2009 5:40 PM0 commentsViews: 2

15 जानेवारी वसईमयुरेश वाघ वसईत 69 गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री अजित पवार आले होते. या मेळाव्याच्या अगोदर शिवसेनेनं जलसंपदा मंत्री अजित पवार यांना अर्धी मागणी पूर्ण केल्याबद्दल सत्काराचा अर्धा नारळ दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी शेकडो शिवसैनिक अजित पवार यांचा अर्धा सत्कार करण्यासाठी सभास्थानी जमले होते. गेल्यावर्षी अजित पवार वसईत आले असता शिवसेनेनं पाणीपुरवठा योजनेला शासकीय अनुदान देण्याची आणि वसईतल्या नगरपरिषदांनी लावलेली 9 पट पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. त्यात पवारांनी अनुदान दिलं खरं. पण पाणीपट्टी रद्द झाली नाही. त्यामळे अनुदान रद्द करण्याचा अर्धा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेनेनं अजित पवारांना नारळ देऊन प्रतिकात्मक अर्धा सत्कार केला.

close