महाप्रलयावर लाजिरवाणं राजकारण, नेत्यांमध्ये धक्काबुक्की

June 26, 2013 10:06 PM1 commentViews: 575

fscuffle betn leader726 जून : नैसर्गिक आपत्तीच्या राजकारणाचा विद्रूप चेहरा आज पाहायला मिळाला. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या आंध्र प्रदेशातल्या पीडितांना विमानातून घरी कोण घेऊन जाणार, यावरून आंध्रप्रदेशातले दोन नेते आपापसात भिडले. डेहराडूनच्या जॉलीग्रँट एअरपोर्टवर हा लाजीरवाणा प्रकार घडला. काँग्रेसचे नेते हनुमंता राव आणि तेलगु देसमचे ज्येष्ठ नेते रमेश राठोड या दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप करत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि टीडीपीमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. त्याचं रुपांतर आज चक्क धक्काबुक्कीत झालं. आम्ही पीडितांची मदत करत असताना हनुमंता राव यांनी हस्तक्षेप का केला असा सवाल राठोड यांनी केलाय.

तर तेलगु देसमच्या कार्यकर्त्यांनीच भांडण उकरून काढलं असा आरोप काँग्रेस नेते हनुमंता राव यांनी केला. मृतांच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार संपूर्ण देशानं टिव्हीच्या माध्यमातून बघितला. लष्कर आणि हवाई दलाचे जवान प्राणांची बाजी लावून बचावकार्य करत असताना, राजकारण्यांमध्ये याबद्दल जराही संवेदनशीलता नाही, असाच अर्थ या घटनेतून निघतो.

काँग्रेस नेते हनुमंता राव यांची प्रतिक्रिया

बोर्डिंग पासच्या मुद्द्यावरून टीडीपीच्या लोकांनीच आम्हाला चिथावलं. ते राजकारण करत आहेत. मला एन. चंद्रबाबू नायडू यांना विचारायचं आहे की ते असं राजकारण का करताहेत ?

 

दरम्यान, पुराच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झालेलं केदारनाथ मंदिर बांधून देण्याचा प्रस्ताव गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला होता. पण, उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी हा प्रस्ताव फेटाळला. उत्तराखंड सरकारच हे मंदिर उभारेल, असं बहुगुणा यांनी म्हटलंय.

  • राज

    कोंग्रेस ने ह्या दोन नेत्यांना सुस्पेंड करायला हवे…..ह्या दोन नेत्यांना बौन्द्री वरती पाठवावे..कारण ते तेथेच खूप चांगले लढतील…माफ करा मी त्यांना नेते बोलल्याबद्दल ……

close