काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मनसे स्टाईल’ने परप्रांतीयांना पिटाळून लावले

June 26, 2013 10:13 PM1 commentViews: 1182

shindhudurg26 जून : सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल आंदोलन करत महावितरणमध्ये नियुक्ती झालेल्या परजिल्ह्यातल्या उमेदवारांना कंत्राटी कामगारांनी मारहाण करून पळवून लावलं. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनं या मारहाणीचं समर्थन केलंय.

गेल्या सहा वर्षांपासून काम करणार्‍या स्थानिक कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा नाहीतर इतर जिल्ह्यातल्या उमेदवारांना कामावर येऊ देणार नाही, हजर होऊ देणार नसल्याचा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे हा सगळा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असताना महावितरणच्या अधिकार्‍यांनी मात्र अज्ञातांकडून कार्यालयात घुसून मारहाण केली अशी तक्रार दिलीय.

महावितरणमध्ये सध्या विद्युत सहाय्यक पदावर भरती सुरू आहे. त्यात निवड झालेले नांदेड लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातले पाच उमेदवार हजर होण्यासाठी आले होते.

  • नाना कुलकर्णी

    युपी बिहारमधील परप्रांतीयांच्या बाबतीत वारंवार प्रेमाचे भरते येणाऱ्या काँग्रेसला आपल्याच राज्यातील इतर जिल्हयांमधील उमेदवार मात्र परप्रांतीय वाटतात याचं सखेद आश्चर्य वाटतं दुसरं काय बोलणार

close