धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट

June 26, 2013 10:17 PM0 commentsViews: 123

dhule pani kapat26 जून : भर पावसाळ्यात धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट कायमच आहे. धुळ्यात तब्बल 6 दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होणार आहे. नकाणे तलाव आणि तापी जलपुरवठा योजनेतून शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मधल्या काळात तापीतून सोडण्यात आलेलं पाणी आणि तुलनेनं झालेला कमी पाऊस यामुळे पाण्याच्या पातळीत फारशी वाढ नाही.

आतापर्यंत धुळेकरांना दोन दिवसांनंनतर पाणी येत होतं आता ही पाणी कपात 6 दिवस असणार आहे. तापी नदीवर सुलवाडे येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजचे दरावाजे पावसाळ्यात खुले करण्यात येतात. त्यामुळे या बॅरेजचा साठा संपलाय. शहराला लागणार्‍या 240 क्युसेक्स पाण्याची गरज भागवण्यासाठी आता नकाणे तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतोय. पण नकाने तलावात देखील पाणी नसल्यानं एक आठवड्यानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

close