आरपीआयने मागितल्या लोकसभेच्या 5 जागा

January 15, 2009 12:46 PM0 commentsViews: 4

15 जानेवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आगामी लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 5 जागा मिळाव्यात अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलीय. लोकसभा निवडणुकीत असलेल्या महाराष्ट्रातल्या 5 राखीव जागा दोन्ही काँग्रेसने आपल्या पक्षाला सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केलीय. तसंच दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपाबाबत जेव्हा चर्चा होईल त्यावेळी शिर्डी, कल्याण, अमरावती आणि लातूर या जागा आपल्या पक्षासाठी सोडण्याचा विचार त्यांनी करावा असंही आठवले यांनी सांगितलंय.

close