गिरणी कामगारांच्या वारसांना वारस दाखला फी माफ

June 26, 2013 10:52 PM0 commentsViews: 281

girnikamagar3326 जून : गिरणी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी….घरं मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या गिरणी कामगारांच्या वारसांना वारस दाखला मिळवण्यासाठी भरावी लागणारी फी राज्य सरकारनं माफ केलीय. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात एक बैठक घेऊन कामगारांशी चर्चा करून याबाबत घोषणा केली.

यामुळे वारस हक्क मिळालेल्या गिरणी कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार असून त्यामुळे त्यांचे जवळपास चाळीस हजार रुपये वाचणार आहेत. पण गिरणी कामगारांच्या पाच संघटनांनी येत्या 28 जूनला पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. घरं ताब्यात देण्याची प्रक्रिया लवकर पार पाडावी, अशी त्यांची मागणी आहे.

close