हेराफेरी करणा-या ठगाला अटक

January 15, 2009 12:45 PM0 commentsViews: 6

15 जानेवारी ठाणेदोन कोटींची हेराफेरी करणा-या एका ठगाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. महेश जेठवानी असं त्याचं नाव आहे. भाड्याने गाड्या लावण्याचा त्याचा व्यवसाय आहे. ठाण्यातल्या कोपरी परिसरात त्यानं 'सिग्मा मोटर्स' नावाची कंपनी उघडली होती. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तो लोकांना त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवायचा. तसंच जास्तीत जास्त व्याज देण्याचंही आश्वासन देऊन त्यानं अनेकांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत त्यानं 1500 लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. औरंगाबादमध्ये या फसवणुकीची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक झाली असून पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोधात आहेत. पोलिसांनी फसवणूक झालेल्या ग्राहकांना तक्रार करण्याचं आव्हान केलं आहे.

close