सोनसाखळी चोरी कॅमेर्‍यात कैद

June 26, 2013 10:56 PM0 commentsViews: 1246

26 जून : अंबरनाथमध्ये वटपोर्णिमेच्या दिवशी तीन सोनसाखळी चोरीचे प्रकार घडले होते. त्यातील दिवसाढवळ्या घडलेला मोहनपूरम भागातील एक प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. कानसाई भागात राहणार्‍या पल्लवी म्हात्रे या सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपल्या मैत्रिणींसोबत वडाची पुजा करायला जात असताना दोन दुचाकी स्वारांनी त्यांच्या गळ्यातील तब्बल 7 तोळ्याचं मंगळसूत्र चोरून नेलं. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पोलिसांना मिळून सुद्धा आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. अंबरनाथमध्ये दिवसागणिक सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढत चालले आहे. मात्र ते रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

close