एसबीआय सत्यमला कर्ज देणार

January 15, 2009 5:53 PM0 commentsViews: 4

15 जानेवारी सत्यमला कर्ज देण्यास स्टेट बँक ऑफ इंडिया तयार असल्याची माहिती बँकेतील काही सूत्रांनी दिली आहे. सरकारनं सत्यमच्या बोर्डावर तीन नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. सरकारनं तीन नव्या संचालकांची सत्यमच्या अंतरीम बोर्डावर नियुक्ती केली. सत्यम कंपनीची 1700 कोटीची वसुली बाकी आहे, ती जर वसूल झाली, तर कंपनीला कुठल्याही बेलआऊट पॅकेजची गरज भासणार नाही, असं सरकारनं नियुक्त केलेले कंपनीचे एक संचालक दीपक पारेख यांनी म्हटलंय. सत्यमचं नवं बोर्ड पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी शनिवारी भेटणार आहेत.

close