नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक

June 26, 2013 11:26 PM1 commentViews: 143

26 जून : दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि लढवय्या नेता नेल्सन मंडेला यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत. 8 जूनला त्यांना तिसर्‍यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्येच आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष जॅकोब झुमा यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यांचा अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी सर्व कुटुंब प्रार्थना करत असल्याचं मंडेला यांच्या मुलीनं सांगितलं. दरम्यान, मंडेला यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांच्या चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर प्रार्थनाही केली.

  • adsasda

    Nice Story

close