नरेंद्र मोदी मुंबईत, गडकरी बैठकीला गैरहजर

June 27, 2013 2:19 PM0 commentsViews: 708

gadkari and modi27 जून : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जातोय. पण या बैठकीला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी गैरहजर आहेत.

दरम्यान, मुंबई भेटीत मोदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार की, नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोन दिवसांपूर्वीच दैनिक सामनामधून मोदींवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सारवासारव केल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकला होता.

रंगशारदा सभागृहात होणार्‍या दुपारी तीन वाजता मोदी सीसीआयच्या गुडगर्व्हनन्स विषयीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर ते संध्याकाळी स्टॉक एक्सचेंजच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. याच ठिकाणी विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

close