बाबा बोडकेवरून उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका

January 16, 2009 6:43 AM0 commentsViews: 17

16 जानेवारी, सोलापूरबाबा बोडके प्रकरणावरून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतलं आहे. बाबा बोडके प्रकरणावरून वादळ उठलं होत. त्यावरच उद्धव यांनी राष्ट्रवादीला टीकेचं लक्ष्यं केलं. त्यामुळे आता हा वाद चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत. "ज्या वृत्तीचा पक्ष आहे, त्याच वृत्तीची माणसं पक्षामध्ये येत-जात असतात. तरीसुद्धा त्यांनी वेळेत चूक सुधारली, हे चांगलं झालं" या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला.

close