ठाण्यात पाईपलाईन फुटली

June 27, 2013 6:23 PM0 commentsViews: 138

thane pipe line27 जून : पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईन्स फुटण्याचा सिलसिला सुरूच आहे. बुधवारी मुंबईत पाण्याची पाईपलाईन फुटल्यानंतर आज ठाण्याला पाणीपुरवठा करणारी कल्याण शिळफाटा रोडवरील कटाई टोल नाक्याजवळ असलेली पाईपलाईन फुटली आहे. 72 इंचाची ही पाईपलाईन फुटल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झालंय. विशेष म्हणजे या महिन्यात ही पाईपलाईन तिसर्‍यांदा फुटली आहे.

पाण्याच्या प्रवाहानं पाच गाड्यांचंही नुकसान झालंय. तसंच या भागातील दुकानांनचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या भागातील बीएसएनएलच्या वायर्सचंही नुकसान झाल्यामुळे फोन सेवांनाही याचा फटका बसलाय. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर बारावी धरणातून या पाईपलाईनलसाठी सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलंय. या पाईपलाईननं डोंबिवली, कल्याण, मुंब्रा, कळवा, मीरा भाईंदर या भागांना पाणीपुरवठा होतो.
पाणीपुरवठा होतो.

close