माऊलींचा पालखी रथ झाला हायटेक

June 27, 2013 7:35 PM0 commentsViews: 490

27 जून : सध्या सगळ्या वारकर्‍यांना वेध लागले आहेत ते आळंदीतून निघणार्‍या माऊलींच्या पालखी प्रस्थानाचे. 30 तारखेला म्हणजे रविवारी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पंढरीकडे होणार आहे. विशेष बाब म्हणजे माऊलींच्या पालखीला यावर्षी शक्तीशाली बॅटरी लावण्यात येणार आहेत, त्यामुळे बैलांच्या मानेवरचं पूर्ण ओझं कमी होणार आहे. मागच्या वर्षीच्या वारीत एका बैलाचा आकस्मिक मृत्यू झाला होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. बॅटरी बसवलेला हा रथ आज मंदिर समितीला दिला जाणार आहे.

close