शीतल साठेला जामीन

June 27, 2013 8:08 PM0 commentsViews: 616

sheetal sathe27 जून : कबीर कला मंचची सदस्य शीतल साठेला जामीन मिळालाय. 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन देण्यात आलाय. शीतल साठे गरोदर आहे. त्यामुळे बाळाचा जन्म कारागृहात होऊ नये या मुद्यावर तिला जामीन देण्यात आला आहे. कबीर कला मंचचे कार्यकर्ते असलेल्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना 2 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

या दोघांवरही नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आणि आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. हे दोघे दोन वर्षांपासून भूमिगत होते. 2 एप्रिलला विधानभवन परिसरात सत्याग्रह करण्यासाठी आले ते आले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. आपल्या कलाकृतींतून या दोघांनी समाजात असंतोष पसरवला, असाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे.

close