नायब तहसीलदाराची धुलाई

June 27, 2013 8:38 PM3 commentsViews: 3500

27 जून : धुळ्याचे नायब तहसीलदार ईश्वर राणे यांना आज शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बेदम मारहाण केली. महिलांकडून ते शरीर सुखाची मागणी करत होते, असा आरोप शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केलाय.

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणं मंजूर करण्यासाठी पैशांबरोबर महिलांकडून शरीर सुखाची मागणी करत असल्याचा ठपका तहसीलदारावर ठेवण्यात आलाय. या तहसीलदाराच्या विरोधात अनेक महिलांच्या गेली अनेक दिवस तक्रारी येत होत्या.

यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी शिवसेनेच्या महिला कायकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. तक्रारींमध्ये सत्य असल्याचा दावा करत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गाठून जाब विचारला. मात्र त्यानं शिवीगाळ करायला सुरूवात केल्यानं महिलांनी त्याला चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी राणेला ताब्यात घेतलं.

 • Rajendra Gonarkar

  निखिलजी,
  अंतर्मुख करणारा वेब संवाद पाहिला आपण मांडलेले मुद्दये खूप महत्वाचे आहेत. पण याहून हि एक भयंकर
  बाब आहे ती म्हणजे जात , धर्म , वर्ग !!
  आपत्ती च्या वेळी मदत कार्य करताना हि मानसिकता विसरल्या जात नाही . याला काय म्हणायचे ? उत्तराखंड मध्ये
  ओढवलेल्या आपत्तीत भावीक , पर्यटक किती अडकले याचेच वार्तांकन पाहायला व वाचायला मिळाले . उत्तराखंडमध्ये
  स्थानिक लोक नव्हतेच का ? गेलेले भाविक मध्यम व उच्च मध्यम वर्गीय होते. म्हणून तेच महत्वाचे असे म्हणायचे का ?
  किल्लारीच्या वेळी हेच । गुजरात दंगलीत मुस्लिमाच्या बाबतीत भेदभाव … हे काय आहे ? जीवन क्षणभंगुर आहे हा घोष
  करायचा पण असे म्हणताना डोक्यात नि मनात जात , धर्म , वर्गीय भावनेची घाण बाळगायची … हे थांबणार कि नाही
  हा खरा प्रश्न आहे .
  निखिलजी , आपला वेब संवाद रुचला . या पुढेही भेटत राहू !!!

  — डॉ. राजेंद्र गोणारकर , नांदेड

 • Mangesh Sonwane

  “yachi gadhwawar Dhind kadhli pahije”

 • sujit jadhav

  वागळे सर
  आपला हा वेब सवांद खरोखरच अंतर्मुख करणारच आहे. संकट म्हणजे हि फक्त पैसे लुटणार्यासाठी आणि या नालायक राज कारण्या साठीच खूप मोठी संधी आहे. लोक पैश्यालाच सर्व आणि सर्वस्वच का मानतात हेच काही कळत नाही. जो पर्यंत विचारात फक्त पैसा आणि पैसाच राहील तोपर्यंत या परिस्थितीमध्ये काहीही बदल होणार नाही.

  लोक हे का विसरतात कि हम खाली हात आये थे हम खाली हात हि जाने वाले हें. लोक ज्यावेळी स्वत: माणूस म्हणून जगायला शिकतील तेव्हाच या सार्या गोष्टी बदलतील अन्यथा काही नाही .

close